पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उद्यान घाट व अम्फीथिएटर हे ठाणे शहरातील उपवन परिसरातील एक सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध व सौंदर्यपूर्ण सार्वजनिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. बनारस घाटांच्या प्रेरणेतून साकारलेल्या या विकास प्रकल्पात पारंपरिक स्थापत्यशैली आणि निसर्गाच्या शांततेचा सुंदर संगम पाहायला मिळतो. नागरिकांना विरंगुळा, आत्मिक शांतता व सांस्कृतिक अनुभव घेण्यासाठी हे स्थळ लोकप्रिय झाले आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पाला मा. श्री. प्रताप सरनाईक यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व भक्कम पाठबळ लाभले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे प्रकल्पाचे नियोजन, सुशोभीकरण व सांस्कृतिक संकल्पना अत्यंत काटेकोरपणे आणि दर्जेदार पद्धतीने साकारण्यात आली आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये
- उपवन तलावातील अहिल्या होळकर घाट हा बनारसच्या घाटाची अनुभूती देतो.
- नागरिकांच्या विश्रांतीसाठी व फेरफटक्यासाठी हिरवळीने नटलेली उद्याने
- सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज अम्फीथिएटर
- उपवन तलावाचे सौंदर्य वाढवणारे म्युझिकल फाऊंटन
भारताच्या अनेक ऐतिहासिक घाट व मंदिरांच्या निर्मितीमागील दूरदृष्टी लाभलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पावन स्मृतीस अर्पण केलेला हा प्रकल्प वारसा, संस्कृती व सामुदायिक समृद्धीचे प्रतीक आहे. मा. श्री. प्रताप सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ठाणे शहरात परंपरा जपणारा आणि नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात विरंगुळा देणारे हे ठिकाण ठाणेकरांच्या पसंतीत उतरत आहे.