ठाणे शहरातील स्व. इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेश रुग्णालय हे ठाणे शहारतील सुलभ व पारदर्शक आरोग्य सेवेचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. 150 खाटांचे हे सुपर-स्पेशॅलिटी रुग्णालय हे पैशा अभावी उपचार थांबू नये या धोरणावर उभारण्यात आले आहे.
रुग्णालयाच्या “नो कॅश काउंटर” धोरणामुळे सरकारी योजनांच्या माध्यमातून रुग्णांना पूर्णपणे कॅशलेस उपचार मिळतात. त्यामुळे हजारो कुटुंबांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळते. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यक्षम व्यवस्थापनामुळे हे रुग्णाल नागरिक-केंद्रित आरोग्यसेवेचे उत्कृष्ट उदाहरण ठरते.
वाढत्या लोकसंख्येच्या गरजांना लक्षात घेऊन, वेगवेगळ्या आरोग्य तज्ज्ञांकडून रुग्णांना व्यापक उपचार दिले जातात. ते तेथील कोणताी आर्थिक बोजा न लादता.
मुख्य वैशिष्ट्ये
-
“नो कॅश काउंटर” प्रणालीअंतर्गत पात्र रुग्णांना पूर्णपणे कॅशलेस उपचार
-
150 खाटांचे सुपर-स्पेशॅलिटी रुग्णालय, प्रगत निदान सुविधांसह
-
कार्डियोलॉजी, ऑन्कोलॉजी, न्युरोलॉजी, पेडियाट्रिक्स, सर्जरी, गायनॅकोलॉजी यांसारख्या अनेक विशेषज् सेवा
-
TMC व Platinum Hospitals यांच्या संयुक्त सहकार्याने अधिक कार्यक्षम सेवा
-
दोन मुख्य केंद्रे – कपूरबावडी, ठाणे पश्चिम आणि मीरा रोड पूर्व
प्रत्येक घरापर्यंत जागतिक दर्जाची आरोग्यसेवा पोहोचवणारे हे रुग्णालय ठाणे आणि मीरा-भाईंदरसाठी आशा, सन्मान आणि नव्या दिशेचे प्रतीक आहे.