घोडबंदर, गायमुख आणि कासारवडवली परिसरात अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीची गंभीर समस्या भेडसावत होती. या दैनंदिन समस्येमुळे हजारो नागरिकांना प्रचंड गैरसोय, वेळ आणि इंधनाचा अपव्यय अश्या समस्यांचा सामना करावा लागत होता. ही समस्या ओळखून आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला आणि या मार्गावर वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी स्वतंत्र उड्डाणपूलाची ठाम मागणी केली.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक मंजुरी दिली आणि कामाला गती मिळाली.
आज कासारवडवली उड्डाणपूलाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.
यामुळे ठाणे – बोरीवली – वसई – JNPT – गुजरात या महत्त्वाच्या मार्गांवरील प्रवास अधिक सुरळीत झाला आहे. तसेच गायमुख–वाघबीळ मार्गावरील कोंडीमध्येही मोठी घट दिसून येत आहे.
नागरिकांना मिळणारे फायदे
-
घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीमध्ये लक्षणीय घट
-
महत्त्वाच्या जोडमार्गांवर वाहतुकीचा वेग वाढला
-
स्थानिक तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासात मोठा दिलासा
सध्या उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूची मार्गिका खुली झाली असून उजव्या बाजूच्या मार्गिकेचे काम जलद गतीने सुरू आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग आणखी सुरक्षित, वेगवान आणि सुकर होणार आहे.