भारतरत्न लता मंगेशकर सभागृह हे मीरा-भाईंदर शहराची सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम करणारे एक आधुनिक कला केंद्र आहे. दिनांक ११ ऑक्टोबर २०२२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. हे सभागृह शहराची सांस्कृतिक जडणघडण मजबूत करणे आणि कलाकारांना जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरत आहे.

मुख्य वैशिष्ट्ये

  • अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज व पूर्णतः कार्यरत सभागृह

  • दोन हॉल – सुमारे ८५० आसन क्षमतेचा मुख्य हॉल आणि एक मिनी थिएटर

  • BOT मॉडेल आणि TDR च्या माध्यमातून उभारणी – महापालिकेच्या निधीचा वापर नाही

  • प्रगत प्रकाशयोजना, साउंड सिस्टीम आणि सेंट्रल एसी

  • १५ ग्रीन रूम, कॅफेटेरिया आणि प्रशस्त मोफत पार्किंग सुविधा

  • केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आरक्षित – खासगी कार्यक्रमांना परवानगी नाही

हे सभागृह नाट्यप्रयोग, संगीत मैफिली, नृत्य सादरीकरणे तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे. आधुनिक सुविधा आणि उत्कृष्ट ध्वनिक्षमतेमुळे प्रेक्षक आणि कलाकार दोघांसाठीही दर्जेदार अनुभव मिळतो. मीरा-भाईंदरमध्ये वाढणाऱ्या सांस्कृतिक चळवळीचे हे सभागृह एक प्रतीक म्हणून उभे आहे.

श्री. प्रताप सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन व सक्रिय सहकार्यामुळे लता मंगेशकर सभागृह आज शहरातील एक प्रतिष्ठित सांस्कृतिक वारसा बनले आहे. ही वास्तु कलेला प्रोत्साहन देत नव्या कलाकारांना संधी उपलब्ध करून देते आणि समाजाच्या सांस्कृतिक वातावरणाला अधिक समृद्ध करते.