ठाणे आणि मिरा भाईंदरमधील नागरिकांचं अनेक वर्षांपासूनचं सुरक्षित,जलद आणि दर्जेदार प्रवाशाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी मा.श्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे मेट्रोची संकल्पना मांडली होती. आज तेच स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे. ही ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब असून, शासनाकडे सातत्याने त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि जनतेच्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे.

दहिसर–काशीगाव मेट्रो मार्ग सुरू व्हावा यासाठी मा. श्री प्रताप सरनाईक यांनी सातत्याने प्रयत्न केले. मंत्रालयात वेळोवेळी पाठपुरावा केला, गरज पडल्यास शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आणि विधानसभा सभागृहात मिरा भाईंदरच्या नागरिकांच्या भावना ठामपणे मांडल्या. प्रत्येक टप्प्यावर नागरिकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा आणि त्यावर ठोस निर्णय व्हावा, यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

या प्रकल्पासाठी झालेले महत्त्वाचे टप्पे :

  • विविध शासकीय विभागांमध्ये सातत्याने पाठपुरावा

  • मिरा-भाईंदरच्या नागरिकांच्या हितासाठी ठाम भूमिका

  • मंजुरी प्रक्रियेला गती देण्यासाठी विशेष प्रयत्न

मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मेट्रोची यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे. या महत्त्वाच्या टप्प्यानंतर ठाणे-मिरा भाईंदर मेट्रो लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार असून, हजारो प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा मिळणार आहे.