आपल्या संस्कृतीत “जल म्हणजे जीवन” मानले जाते. आज वाढत्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धन आणि पुनर्वापराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
ही गरज ओळखून, ओवळा–माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्य नगर परिसरात जुन्या विहिरींच्या पुनरुज्जीवन व नूतनीकरणासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
मोरवाडी चाळ लक्ष्मीपार्क फेज–१, शंकर मंदिर, लोकमान्य नगर पाडा क्र. २ रेल्वे कॉलनी तसेच लोकमान्य नगर पाडा क्र. ४ येथील विहिरींना नवसंजीवनी देण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत :
-
ठाण्यातील ७० पैकी ३६ जुन्या विहिरींची साफसफाई करण्यात आली
-
गाळ काढून नैसर्गिक जलस्त्रोत पुन्हा सक्रिय करण्यात आला
-
नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी मिळावे यासाठी आरओ प्रकल्प उभारण्यात आले
₹५० कोटींच्या विशेष निधीच्या सहाय्याने राबविण्यात येणारा हा उपक्रम स्थानिक जलटंचाई कमी करण्यास मोठ्या प्रमाणात मदत करणार असून हजारो नागरिकांना नियमित व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
शाश्वततेकडे टाकलेले पाऊल. आपले भविष्य सुरक्षित करण्याचा निर्धार.